उस्मानाबाद : बेहिशोबी मालमत्ता जमवणारा आणि सध्या एसीबीच्या अटकेत असलेल्या डॉक्टर अशोक मोरताळेनं जिल्हा रुग्णालयातच दारू पार्टी केल्याचं पुढं आलंय.
बेहिशेबी मालमता प्रकरणी काल रात्री एसीबीने मोरताळेला अटक केली होती. त्यानंतर उपचारासाठी मोरताळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या मोरताळेने इतर डॉक्टरांसह बंद रुममध्ये पार्टी केल्याचं उघडकीस आलं. यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये यांची नोंद करण्यात आली आहे.