पुण्यात रहिवासी इमारतीला भीषण आग, तिघांचा मृत्यू झाल्याची भीती

Updated: Dec 16, 2015, 07:23 PM IST

पुणे : पुणे भुसारी कॉलनीत एका रहिवासी इमारतीला आग लागली असून या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. या इमारतील ४ लोक अडकले होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

डावी भुसारी कॉलनी मयुरेश डायनिंग हॉलशेजारी शेडमध्ये ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितल आहे.