चंद्रपुरात गाडी नाल्यात पडून चौघेजण बेपत्ता

चंद्रपूरात इंडिका कार नाल्यात पडून चौघेजण बैपत्ता झालेत. कोठारी ते येनबोडी दरम्यानच्या किन्ही पुलावर ही दुर्घटना घडलीये. 

Updated: Jul 10, 2016, 12:54 PM IST
चंद्रपुरात गाडी नाल्यात पडून चौघेजण बेपत्ता title=
सौजन्य - एएनआय

चंद्रपूर : चंद्रपूरात इंडिका कार नाल्यात पडून चौघेजण बैपत्ता झालेत. कोठारी ते येनबोडी दरम्यानच्या किन्ही पुलावर ही दुर्घटना घडलीये. 

या दुर्घटनेत कारमधून प्रवास करणारे चारही शिक्षक बेपत्ता आहेत.. हे चौघे कोठारीहून येनबोडीकडे जात होते. यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी थेट नाल्यात कोसळली. 

यात चौघे शिक्षक बेपत्ता असून हे सर्व नव्याने सुरु झालेल्या एका कॉन्व्हेंट स्कूलचे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले असून चौघांचा शोध सुरु आहे.