आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक आदिवासींकडे असलेली शस्त्रे सरकारकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय.

Updated: Nov 3, 2016, 07:56 PM IST
आदिवासींनी पोलिसांकडे जमा केली घातक शस्त्रास्त्र  title=

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक आदिवासींकडे असलेली शस्त्रे सरकारकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय.

या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका असलेल्या भामरागड लाहेरी गावातील स्थानिकांनी पोलिसांकडे शस्त्रे जमा केली आहे.

ग्रामस्थांना भेटवस्तू...

या अभियानात तब्बल १० शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. यात पुढाकार घेतलेल्या ग्रामस्थांना सुरक्षा दलांच्या वतीने रेडिओ संच आणि भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला. 

जिल्ह्याच्या इतर भागात पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शस्त्रे जमा करण्याच्या अभियानाला भक्कम प्रतिसाद लाभत असल्याने सुरक्षा दले आणि ग्रामस्थ यांच्यात संवाद वाढविण्यात मदत होणार आहे.