उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई करत ९१ लाख ५० हजार ची रक्कम जप्त केली आहे . उमरगा येथील चौरस्ता भागात वाहनाची तपासणी करीत असताना, संशय आल्याने पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी १ हजार रूपयांच्या नोटा मधून ९० लाख रूपयांच्या तर ५०० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात दीड लाख अशी रक्कम जप्त केली आहे.
ही रक्कम टाटा सुमोत सापडली असुन पोलिसांनी याप्रकरणी ड्राइवरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे . ही रक्कम कोणाची व कोठे नेत असल्याची कोणतीही कागदपत्र चौकशीत पोलिसांना न दिल्याने संशय वाढला आहे .
जप्त केलेली रक्कम ज्या जीप मधून वाहतूक केली जात होती त्या जीपवर लोकमंगल असा बोर्ड लावण्यात आलाय. लोकमंगल ही संस्था राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आहे. हे आहेत. बेहिशोबी काळा पैसा चलनात आणण्यासाठी मल्टीस्टेट व अर्बन बँकांचा आधार घेतला जातोय का याचा तपास पोलिसांनी करायला हवा.