कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे ३ फुटांनी उघडले

कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे ३ फुटानी उचलले 

Updated: Aug 8, 2016, 01:23 PM IST
कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे ३ फुटांनी उघडले title=

सातारा : कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे ३ फुटानी उचलले असून कोयना नदीत प्रतिसेकंद १७ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाने सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या २७८ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान संगमनगर धक्का पूल व निसरे फरशि पूल पाण्याखाली गेला आहे.

महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणात सध्या ८७.६५ टीएमसी पाणीसाठा असल्याने आणि सध्या कोयना पाणलोट क्षेत्र, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस असल्याने कोयना धरणात ६३ हजार ५०० क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे धरण व्यवस्थापनाने ६ वक्री दरवाजे ३ फुटाने उचलले यामुळे दरवाजातून १५ हजार क्युसेक्स आणि पायथा वीज गृहातून प्रतिसेकंद २ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग असा एकुण १७ हजार क्युसेक्स पाणी कोयना नदीत सुरु केला आहे.