आश्रमशाळेतील चिमुरडीवर अधिक्षकेच्या मुलाचा वारंवार बलात्कार

परभणी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुन्हा एकदा परभणी शहर बलात्काराच्या घटनेनं हादरलंय.

Updated: Aug 8, 2016, 11:43 AM IST
आश्रमशाळेतील चिमुरडीवर अधिक्षकेच्या मुलाचा वारंवार बलात्कार  title=

परभणी : परभणी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुन्हा एकदा परभणी शहर बलात्काराच्या घटनेनं हादरलंय.

पर्वतीनगरातील बाबा एज्युकेशन सोसायटीच्या तुराबत बालक आश्रमातील एका अल्पवयीन अनाथ मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. 

अत्याचार करणारा नराधम हा बालका आश्रमाच्या महिला अधिक्षकांचा मुलगा आहे. या आश्रमात गेल्या पाच वर्षांपासून एक अनाथ मुलगी वास्तव्यास आहे. 

२४ जून २०१५ ते २९ जुलै २०१६ या वर्ष भराच्या काळात बालकाश्रमाच्या अधिक्षका शाहीन यांचा २२ वर्षीय मुलगा तौशिफ यानं वारंवार या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर येतंय. 

गंभीर बाब म्हणजे अधिक्षका शाहीन यांना हा प्रकार माहिती असूनही त्यांनी घटनेकडे दुलर्क्ष केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलीय.