नागपूर जेलमध्ये चाललंय तरी काय? आणखी ५ मोबाईल सापडले

नागपूर सेंट्रल जेलमध्ये आणखी ५ मोबाईल फोन सापडले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये जवळपास एकूण ४१ मोबाईल्स सापडले आहेत. त्यामुळं जेलमध्ये नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Updated: Apr 6, 2015, 01:02 PM IST
नागपूर जेलमध्ये चाललंय तरी काय? आणखी ५ मोबाईल सापडले  title=

नागपूर: नागपूर सेंट्रल जेलमध्ये आणखी ५ मोबाईल फोन सापडले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये जवळपास एकूण ४१ मोबाईल्स सापडले आहेत. त्यामुळं जेलमध्ये नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

नागपूर जेलमधून पाच कैदी फरार झाल्यानंतर जेलमधील कैद्यांचा एक व्हिडिओ पुढे आला होता. त्यात अनेक कैद्यांकडे फोन असल्याचं, कैदी पत्ते खेळत असल्याचं पुढे आलं होतं. त्यानंतर घेतलेल्या झाडाझडतीत तब्बल २६ मोबाईल फोन्स सापडले होते. 

त्यानंतर काल एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी तुरुंगाच्या तपासणीचे आदेश दिले. काल घेतलेल्या झडतीत ७ मोबाईल जप्त करण्यात आले. तर आज झालेल्या झाडाझडतीत ५ मोबाईल सापडले आहेत. त्यामुळं हे जेल आहे की मोबाईल दुकान हा प्रश्न निर्माण होतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.