रत्नागिरी / पुणे : राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघात ५ ठार तर ५४ जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर दोन तर पुणे-सोलापूर मार्गावर एक अपघात झाला.
मुंबई - गोवा महामार्गावर सकाळी दोन ठिकाणी अपघात झाले. त्यात चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झालेत. यातला पहिला अपघात महाड जवळच्या गांधारपाले गावाजवळ झाला. तर दुसरा अपघात कोलाडजवळ झाला. तसेच पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार झाले, तर तीन जण जखमी झालेत.
मुंबई गोवा महामार्गावर दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यात तीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाले. तर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यांना महाडच्या ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दुसरा अपघात कोलाडजवळ झाला. खासगी प्रवासी बस पलटल्यानं झालेल्या या अपघातात दहा प्रवासी जखमी झालेत. तर पुणे-सोलापूर मार्गावर सीमेंट वाहतूक करणारा ट्रक आणि इनोव्हा गाडी यांच्यात हा अपघात झाला. अपघातातले सर्वजण सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज इथले रहिवासी आहेत. ते गुजरातमध्ये नर्मदा स्नानासाठी निघाले असताना हा अपघात झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.