पुण्यातील 350 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा

आयटी कंपनीत नोकरी देण्य़ाच्या नावाखाली साडेतीनशे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

Updated: Aug 23, 2016, 11:00 PM IST
पुण्यातील 350 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा title=

पुणे : आयटी कंपनीत नोकरी देण्य़ाच्या नावाखाली साडेतीनशे सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

पीसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं प्रत्येक इंजिनिअरकडून 25 हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे. कल्याणीनगरमधून कारभार चालवणाऱ्या या कंपनीच्या संचालकांनी मुलांकडून सिक्युरिटी बॉण्डच्या नावाखाली प्रत्येकी 25 हजार रुपये घेतले आणि पसार झाले.

मुला-मुलींचे कॅम्पस इंटरव्ह्यू, चकाचक ऑफिस हे सगळं प्रभावित करणारं होते.15 ते 21 ऑगस्टपर्यंत कंपनीनं सुटी जाहीर केली होती. मात्र 22 ऑगस्टला मुलं-मुली ऑफिसला गेले तर कंपनीच्या संचालकांनी गाशा गुंडाळल्याचं उघड झाले.

याप्रकरणी येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कंपनीच्या देशात अनेक ठिकाणी शाखा असून त्याठिकाणीही फसवणूक झाल्याची माहिती आहे. त्यामुळं या संचालकांनी सुमारे 11 कोटींचा गंडा घातल्याचं बोलले जात आहे.