३२ पैशांचा चेक तुम्ही पाहिला का...

सर्वात छोटे चलन ५० पैसे फार कमी वापरले जात असतांना 32 पैशाचा चेक  कुणी देईल असा विचारही आपण करू शकत नाही मात्र नांदगाव तालुक्यातील  न्यायडोंगरीच्या एका युवकाला व्होडाफोन कंपनीने  चक्क ३२ पैश्याचा चेक परतावा म्हणून पाठविला. पाठविले आहे, कुरीअरद्वारे  आलेला चेक घेण्यासाठी युवकाला 200 रुपये खर्च करावा लागलाय.

Updated: Dec 23, 2016, 05:51 PM IST
 ३२ पैशांचा चेक तुम्ही पाहिला का...  title=

 मनमाड : सर्वात छोटे चलन ५० पैसे फार कमी वापरले जात असतांना 32 पैशाचा चेक  कुणी देईल असा विचारही आपण करू शकत नाही मात्र नांदगाव तालुक्यातील  न्यायडोंगरीच्या एका युवकाला व्होडाफोन कंपनीने  चक्क ३२ पैश्याचा चेक परतावा म्हणून पाठविला. पाठविले आहे, कुरीअरद्वारे  आलेला चेक घेण्यासाठी युवकाला 200 रुपये खर्च करावा लागलाय.

त्याचे झाले असे नांदगाव तालूक्यातील न्यायडोंगरी येथील सचिन खैरनार हे व्होडाफोन कंपनीचे पोस्टपेड सिम कार्ड वापरत होते.व्होडाफोन कंपनीचे सिम त्यांनी आयडिया कंपनीत पोर्टबल केले. त्यावेळी त्यांनी सर्व बिलाची रक्कम अदा केली.ग्राहकाकडून ३२ पैसे  जास्त आले. व्होडा घोन कपंनीने  ते त्यांना परत देण्याचे ठरविले. 

चक्क 32 पैशांच्या चेकचे कुरिअर त्यांना पाठविले,खैरनार हे घरी नसल्याने त्यांचे कुरीअर मालेगाव येथे परत गेले आणि तेथून त्यांना फोन वरुन कुरीअर आले असून ते घेऊन जा अस सांगितले,सचिन खैरनार 50 किमी लांबून मालेगाव येथे गेले. कुरिअरने आलेले पाकीट ताब्यात घेतले. ते  फोडून पाहिल्यावर त्यात व्होडाफोन कंपनीने 32 पैशांचा अँक्सिस बँकेचा चेक असल्याच पाहिल्यावर डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली. 32 पैशाच्या चेक साठी 200 रुपयाचे पैट्रोल मात्र त्यांना खर्च करावे लागले.

व्होडाफोन कंपनीने कंपनीने जास्तीचे आलेले ३२ पैसे परत करून आपली पारदर्शकता जपली मात्र ३२ पैश्याचा चेक घेण्यासाठी ग्राहक सचिन खैरनार यांना २०० रुपये ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागला याची रंजक चर्चा रंगत  आहे .