मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ३ ठार

गोवा महामार्गावर लांजा येथील वाकेड घाटात झालेल्या अपघात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Updated: May 24, 2016, 04:34 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ३ ठार title=

रत्नागिरी : गोवा महामार्गावर लांजा येथील वाकेड घाटात झालेल्या अपघात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

मुंबई -गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील वाकेड घाटात स्वीप्ट आणि व्होल्वोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा गंभीर होता. की, यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर एकाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. 

तर स्विफ्टमधील आणखी दोनजण गंभीर जखमी झालेत. ओव्हरटेक करताना स्विफ्टनं समोरून येणाऱ्या व्होल्वोला समोरून जोरदार धडक दिली.