एक्स्प्रेसमधून २२ लाखांची रोकड जप्त

अहमदाबाद एक्स्प्रेसमधून हवालाची रक्कम नेत असताना आरपीएफनं एकाला अटक केलीय. जळगाव रेल्वे स्टेशनवर या आरोपीला अटक करण्यात आलीय. तब्बल 22 लाखांची रोकड नेत असताना रणजीत ठाकूर याला अटक करण्यात आलीय. 

Updated: Dec 22, 2015, 05:08 PM IST
एक्स्प्रेसमधून २२ लाखांची रोकड जप्त title=

जळगाव : अहमदाबाद एक्स्प्रेसमधून हवालाची रक्कम नेत असताना आरपीएफनं एकाला अटक केलीय. जळगाव रेल्वे स्टेशनवर या आरोपीला अटक करण्यात आलीय. तब्बल 22 लाखांची रोकड नेत असताना रणजीत ठाकूर याला अटक करण्यात आलीय. 

रणजीत अमरावतीहून सुरतला ही रोकड नेत होता. हजारांच्या नोटांचे 6 तर 500 च्या नोटांचे 32 बंडल आरपीएफनं त्याच्याकडून जप्त केले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे आरपीएफनं ही कारवाई केली आहे. रणजीत ठाकूर नेमकं ही रक्कम कशासाठी आणि कुठं घेऊन जात होता याची कसून चौकशी करण्यात येत आहे.