शिर्डी : हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, मागील ३ दिवसात शिर्डींच्या दानपेटीत १ कोटी ७ लाख रूपये जमा झाले आहेत.
हे १ कोटी सात लाख रूपये हजार, पाचशेच्या नोटांचे आहेत. १ हजार रूपयांच्या ५ हजार ५०० तर, ५०० रूपयांच्या ११ हजार नोटा दान पेटीत मिळाल्या आहेत. दानपेटीत जुन्या नोटांचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे.
संस्थानच्या वतीनं देणगी कक्षात जरी १००० आणि ५००च्या नोटा स्वीकारल्या जात नसल्या, तरी मंदिरातील दान पेट्यांमध्ये या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहेत.
दरम्यान, त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत आणखी जुन्या नोटा दान पेटीत मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील काही मंदिरातील दानपेट्याच सील करण्यात आल्या आहेत. नोटांबरोबरच ६५ ग्रॅम सोनं तर २५०० ग्रॅम चांदीही साईबाबांना अर्पण करण्यात आली आहे.