कृष्णा नदीकाठी मच्छीमारावर मगरीचा हल्ला

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठ हा मगरमिठीत आलाय. भिलवडी इथल्या कृष्णा नदीच्या पात्रात मच्छीमार अशोक नलावडे यांच्यावर मगरीनं हल्ला करून त्याना गंभीर जखमी केलंय. 

Updated: May 28, 2015, 12:08 PM IST
कृष्णा नदीकाठी मच्छीमारावर मगरीचा हल्ला  title=

सांगली: सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठ हा मगरमिठीत आलाय. भिलवडी इथल्या कृष्णा नदीच्या पात्रात मच्छीमार अशोक नलावडे यांच्यावर मगरीनं हल्ला करून त्याना गंभीर जखमी केलंय. 

जखमी नलावडे यांना उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशोक नलावडे हे दुपारी मासे पकडण्यासाठी नदीपात्रात गेले होते. त्यावेळी मगरीनं अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांनी मगरीपासून स्वता:चा बचाव करून घेतला. पण त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.  

महिन्याभरापूर्वी चोपडेवाडी इथल्या शाळकरी मुलाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या परिसरात मगरीनं अनेकांवर हल्ले केलेत. नदीकाठावरील नागरिकांवर मगरीचे हल्ले वाढत चाललेत. यामुळे भिलवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

या मगरींचा वनविभागाने बंदोबस्त करावा आणि नदीकाठावर संरक्षक जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी करतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.