ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसई

वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं. 

Updated: Oct 8, 2014, 05:03 PM IST
 title=

वसई : वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - विवेक पंडित
भाजप - शेखर धुनी
काँग्रेस - मायकेल फुर्टाडो
मनसे - स्वप्निल नर 
अपक्ष - हितेंद्र ठाकूर (बविआ)

केळीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या वसईची ओळख आता सर्वाधिक महसूल देणारा तालुका अशी ही बनत चाललीय. हिरव्यागार वनश्रीनं नटलेल्या या जिल्ह्याला चिमाजी अप्पांचा इतिहास आहे. बदललेल्या स्थित्यंतरात वसईचे समाजजीवन आणि पर्यायानं राजकीय वातावरणही आता बदलत चाललय. 

सुमारे 15 लाखांच्या लोकवस्तीत बहुभाषिक वास्तव्य करतात. ख्रिस्ती बांधवाबरोबरच आगरी, कोळी, वाडवळ, गुजराती, मारवाडी, केरळी आणि आता उत्तर भारतीयांचीही वस्ती वाढत चाललीय. 

विविध समाजाची मतं आणि त्यातूनच अपक्षांचे वाढत गेलेल राजकारण वसईचं वैशिष्ठ बनलंय. हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्याला 2009 च्या निवडणूकीत विवेक पंडितानी ललकारत आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली. 

गेली पाच वर्ष या ठाकूर आणि पंडित यांच्यातला संघर्ष सुरुच आहे. आपण गेल्या पाच वर्षात लोकांबरोबरच राहूनच विकास केल्याचा दावा आमदार विवेक पंडित करतायत.

आमदार आपण गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर पुन्हा निवडून येऊ असा दावा करतायत तरी समस्या जैसे थेच आहे.

मतदारसंघातील समस्या
- गाव महापालिकेत असावीत याबद्दलचा प्रश्न पाच वर्षानंतरही अनिर्णीत
- लोकसंख्य़ेच्या प्रमाणात दळणवळणाच्या सुविधा वाढवण्याची गरज
- वाहतूक कोंडीची प्रचंड समस्या
- पाण्याची समस्या कायम
- 69 गावांची पाणी योजना अजुनही कार्यान्वीत नाही

आमदार विवेक पंडित यांचे राजकिय विरोधक हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा विधानसभेसाठी शड्डु ठोकलेत. बहुजन विकास आघाडीच्या एका खासदार आणि दोन आमदारांचा निधी आणत विकास आपणच केल्याचा दावा ठाकूर करतायत.

दोंघाकडून कितीही दावे-प्रतिदावे झाले तरी हितेंद्र ठाकूर आणि विवेक पंडित या वादात वसईचा विकास रखडल्याचे वास्तव राजकिय विश्लेषक व्यक्त करतायत.

एकंदरीतच ठाकूर आणि पंडित यांच्यापैकी  आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे वसईची जनताच ठरवणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.