ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पुरंदर

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे अंजीर आणि सिताफळाचा जिल्हा... खंडेरायाची जेजुरी आणि आचार्य अत्रेंची सासवड भूमीचा पुण्यवान वारसा लाभलेला हा पुरंदर मतदारसंघ... एकेकाळचा जनता दलाचा हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा गड झालाय. 

Updated: Oct 7, 2014, 09:37 PM IST
 title=

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे अंजीर आणि सिताफळाचा जिल्हा... खंडेरायाची जेजुरी आणि आचार्य अत्रेंची सासवड भूमीचा पुण्यवान वारसा लाभलेला हा पुरंदर मतदारसंघ... एकेकाळचा जनता दलाचा हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा गड झालाय. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -             
शिवसेना - विजय शिवतारे
भाजप - संगीताराजे निंबाळकर
काँग्रेस - संजय जगताप
राष्ट्रवादी - अशोक टेकवडे
मनसे - बाबा जाधवराव

२००९ च्या निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी बाजी मारली होती. विजय शिवतारे ६७ हजार ९९८ मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीच्या दिंगबर दुर्गाडे ४४ हजार ५२९ मते मिळाली.  

शिवसेनेचा गड असला तरी स्थानिक समीकरणांमध्ये राष्ट्रवादीचा जोर दिसतोय. जेजुरी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि सासवड नगरपालिकेवर काँग्रेसचा प्रभाव दिसतोय. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेला खाते उघडता आलेले नाही. बाबा जाधवराव मनसेत गेल्याने मनसेला थोडा आधार मिळालाय.

लोकसभा निवडणुकीचा विचार करता या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना ७२ हजार ४३१ मते मिळाली होती. महायुतीच्या महादेव जानकर यांना ७८ हजार ६७ मते मिळाली होती. लोकसभा निकालातील सुमारे सात हजारांचे वाढीव मताधिक्य ही विजय शिवतारेसाठी महत्त्वाची गोष्ट समजली जातेय. विकासकामाच्या आधारे आपण पुन्हा निवडून येऊ, हा विश्वास त्यांच्या बोलण्यातून येतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.