ऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे शहर

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे विद्यमान आमदार आहेत. जातीची समीकरणं मांडत धुळ्यातल्या राजकारणाची गणितं मांडली जातात. पांझरा नदीच्या मध्यमागी मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर वसलेलं हे धुळे शहर.

Updated: Oct 1, 2014, 03:53 PM IST
ऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे शहर title=

धुळे : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे विद्यमान आमदार आहेत. जातीची समीकरणं मांडत धुळ्यातल्या राजकारणाची गणितं मांडली जातात. पांझरा नदीच्या मध्यमागी मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर वसलेलं हे धुळे शहर.धुळे शहराचे विद्यमान आमदार लोकसंग्राम पक्षाचे अनिल गोटे आहेत. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे यांना पराभूत करत २८ हजार 741 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला. अनिल गोटे यांना 59576 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे यांना 28741 मतांवर समाधान मानावं लागलं. 

आमदारांची विकासकामे...

नदीला दोन्ही बाजूंनी  संरक्षण भिंत घालण्यासाठी प्रयत्न,  पंझारे नदीवर बंधारा घातला, झुलेलाल  घाट समस्या मार्गी, स्मशानभूमीमध्ये सोयीसुविधा, जलवाहिन्या आणि विद्युत दिवे यासाठी प्राधान्य, अशी अनेक विकासकामे धुळे शहरातील नागरिकांसाठी केल्याचं गोटे सांगतात..

गोटे यांच्या विकासकामांच्या दाव्यावर विरोधक मात्र टिकेचा आसूड ओढताहेत. गोटे यांनी जनतेला केवळ आश्वासनांची खैरात दिली, असा आरोप विरोधक करतायेत.

धुळे शहरातील समस्या...  

मनमाड -धुळे - इंदोर रेल्वे मार्ग रखडला आहे., दंगलींमुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत., पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे., पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील सावळागोंधळ तसाच आहे., रेल्वे विस्तार नाही  आणि युवकांना रोजगार नाही. त्यामुळे तरुणांचा ओढा हा मुंबई-पुण्याकडे वाढत आहे. अशा अनेक समस्यांमुळे धुळ्यातील जनता त्रस्त आहे. राजकारणी नेतेमंडळी शहरात जातीय सलोखा राखण्याचा का प्रयत्न केला जात नाही, असा सवाल धुळ्यातील जनता करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.