ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बोईसर

बोईसर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. विविध विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांकडून केला जातोय तर आजही हा मतदारसंघ मूलभूत सेवा सुविधांपासून वंचीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय.

Updated: Oct 8, 2014, 04:55 PM IST
 title=

पालघर : बोईसर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. विविध विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांकडून केला जातोय तर आजही हा मतदारसंघ मूलभूत सेवा सुविधांपासून वंचीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 

शिवसेना - कमलाकर दळवी
भाजप - जगदीश धोंडी
काँग्रेस - भुपेंद्र मडवी
मनसे - वसंत रावते 
अपक्ष - विलास तरे (बविआ)

2009 च्या पुनरर्चनेनंतर नव्यानं अस्तित्वात आलेला बोईसर विधानसभा मतदार संघ हा पालघर आणि वसई तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झालाय. अनुसुचित जामातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ देशातील मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर एमआयडीसीसाठी ओळखला जातो. 

आदिवासी, कुणबी आणि वंजारी मतदार या मतदार संघात मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्य़ांसह, भूमीपूत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांनी हा मतदार संघ घेरलेला आहे.

औद्योगिक आणि अति ग्रामीण अशा दोन क्षेत्रात विभागलेल्या या मतदारसंघात 2 लाख 39 हजार 137 मतदार आहेत. एक लाख नऊ हजार 671 महिला असून एक लाख 29 हजार466 पुरुष मतदारांचा समावेश आहे. 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या विलास तरे यांना 52 हजार 837 मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्या सुनील धानवा यांना 40 हजार 627 मतं मिळाली.

बहुजन विकास आघाडीच्या विलास तरे यांना गेल्या काही वर्षात कामाचा धडाका लावल्याचा दावा करण्यात येतोय.
- आमदारांची विकासकामे
- अनेक दुर्गम भागात रस्ते आणि डांबरीकरणाचा धडाका
- गावागावात पाणीपुरवठा योजना
- लघुपाट बंधारे
- समाज मंदिरे.

विविध योजनातुन सुमारे २५० कोटी रुपये त्यांनी आपल्या मतदार संधावर खर्च केले असल्याचा त्यांचा दावा आहे.

बोईसर विधान सभा क्षेत्रातील मतदार मध्ये विद्यमान आमदारांनी विकास कामे केली असेली तरी, प्रत्यक्षात ग्रामीण भागावर दुर्लक्ष असल्याचं दिसते.
- बोईसर विधानसभा मतदार संघातील समस्या.
- औद्योगिक क्षेत्रातील वाढतं जल आणि वायु प्रदुषणांच्या मोठ्या समस्या या मतदार संघात आहेत.
- बोईसर या औद्योगिक शहरांचा खुटलेला विकास.
- स्थानिक भूमीपुत्रांचे प्रश्न प्रलंबित .
- गौण खनिज उत्पन्नावर शासनाच्या जाचक अटी असल्यानं भूमिपूत्र नाराज.
- ग्रामीण भागात पाणी आणि रस्त्याची दुरावस्था 
- सुर्या नदीचं पाणी स्थानिक शेतक-यांना शेतीसाठी मिळत नाही. 
- मनोर या वाढत्या शहरातील रहदारीचा प्रश्न.

या समस्यांचं विकासकांमापेक्षा वरचढ ठरत असल्याने विरोधकांमध्ये आणि मतदारांमध्येही संमिश्र वातावरण दिसतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.