मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या स्नेहभोजनाचं निमंत्रण एनडीएच्या सर्व घटकपक्षांना पाठवण्यात आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या खासदारांसाठी आयोजीत केलेल्या स्नेहभोजनासाठी शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राजन विचारे, राहूल शेवाळे, अरविंद सावंत, गजानन किर्तीक, श्रीरंग बारणे हे खासदार दिल्लीला रावाना झालेत. तर काही खासदारांनी मात्र पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचं सांगत स्नेहभोजनाला दांडी मारलीय.
या स्नेहभोजनाच्या निमित्तानं भाजप-शिवसेनेत निर्माण झालेली कटुता कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही खासदारांनी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.