मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कामध्ये शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर सरकार स्थापनेच्या घटनेने अनपेक्षीत वळण घेतले आहे.
या संदर्भात शिवसेना नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई दिल्लीला रवाना झाले आहेत.
१९ तारखेला झालेल्या मतमोजणीनंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात उदयास आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजप-सेना युती होते की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होता. परंतु, आज शिवसेनेने पुढाकार घेत या संदर्भातील बोलणी करण्यासाठी अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांना दिल्ली येथे पाठविले आहे.
देसाई भाजपचे पर्यवक्षेक आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे सरचिटणीस जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. सरकार स्थापन करण्यासंदर्भातील चर्चा करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.