12.04 PM
वडाळामधून काँग्रेसचे कालिदास कोळंबकर विजयी
12.03 PM
राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहीर यांना शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केले पराभूत
12.01 PM
राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी
11.51 AM
शिवडीमधून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी, मनसेचे विद्यमान आमदार बाळा नांदगावकर पराभूत
11.50 AM
चिपळूण शिवसेनेचे सदानद चव्हाण विजयी
11.32AM
बोरीवलीमधून भाजपचे विनोद तावडे विजयी
11.30AM
ठाण्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे ३५,००० मतांनी आघाडीवर
11.22AM
मुंबईत भाजपने खाते उघडले; मुलुंडमध्ये सरदार तारासिंग विजयी
11.20AM
पनवेलमध्ये बाळाराम पाटील आघाडीवर
11.16AM
रत्नागिरीत शिवसेनेचा भगवा फडकला, सेनेचे उदय सामंत विजयी
11.15AM
सिंधुदुर्ग - नारायण राणे यांचा पराभव
। शिवसेनेचे वैभव नाईक यांनी केला पराभव
। 10207 मतांनी वैभव नाईक यांचा विजय
। गुहागरमधून राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांचा विजय
10.06AM
कल्य़ाण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर विजय
10.50AM
काँग्रेसचे नेते नारायण राणे 7794 मतांनी पिछाडीवर
10.45 AM
डोंबिवलीमधून भाजपचे रवींद्र चव्हाण आघाडीवर
10.40 AM
कोकणात शिवसेनेचा भगवा फडकणार
शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर
नारायण राणे यांना बसणार धक्का
कुडाळ मतदार संघामध्ये नवव्या फेरी राणे पिछाडीवर
सावंतवाडीत दीपक केसरकर आघाडीवर
कणकवली मतदार संघात नितेश राणे आघाडीवर
रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर
10.35 AM
मुंबईत मनसेला मोठा धक्का; बाळा नांदगावकर 8000 मतांनी पिछाडीवर
10.32 AM
वरळीतून शिवसेनेचे सुनील शिंदे आघाडीवर, राष्ट्रवादीचे मंत्री राहिलेले सचिन अहिर पिछाडीवर
10.27 AM
अणुशक्तीनगरमधून शिवसेनेचे तुकाराम काते आघाडीवर, राष्ट्रवादीचे नवाब मलिक पिछाडीवर
10.24 AM
चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे आघाडीवर (9700)
10.23 AM
दिंडोशीतून सुनील प्रभू 4288 मतांनी आघाडीवर
10.23AM
मागाठणे प्रकाश सुर्वे 11498 मतांनी आघाडीवर
10.22AM
माहीममधून मनसेचे नितीन सरदेसाई आघाडीवर
10.21AM
दहीसर भाजपच्या मनिषा चौधरी आघाडीवर
10.01AM
महाडमधून शिवसेनेच भरत गोगावले 7201 मतांनी आघाडी
9.54AM
गुहागर - राष्ट्रवादीचे भास्कर जाधव - 14330
राजापूर - शिवसेनेचे राजन साळवी - 11500
रत्नागिरी - शिवसेनेचे उदय सामंत - 10000
दापोली - शिवसेनेचे सूर्यकांत दळवी - 1875
चिपळूण - शिवसेनेचे सदानंद चव्हाण - 1228
9.54AM
घाटकोपर पूर्वमधून भाजपचे प्रकाश मेहता 18000 मतांनी आघाडीवर
9.54AM
गोरेगावमधून भाजपच्या विद्या ठाकूर आघाडीवर
9.53AM
अंधेरी पश्चिममधून भाजपचे अमित साटम आघाडीवर
9.53AM
अलिबागमधून शेकापचे पंडित पाटील 2705 मतांनी आघाडीवर
9.52AM
नालासोपारामधून क्षितीज ठाकूर 13753 मतांनी आघाडीवर
9.50AM
कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड आघाडीवर
9.45AM
दहीसरमध्ये शिवसेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर, भाजपच्या मनिषा चौधरी आघाडीवर
9.40AM
चिपळूणमधून शिवसेनेचे सदानंद चव्हाण आघाडीवर
9.36AM
दापोलीतून शिवसेनेचे सूर्यकांत दळवी 948 मतांनी आघाडीवर
9.32AM
ऐरोलीतून शिवसेनेचे विजय चौगुले 4177 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे संदीप नाईक पिछाडीवर
9.31AM
भायकळा भाजपचे मधु चव्हाण आघाडीवर
9.27 AM
कणकवलीतून काँग्रेसचे नितेश राणे आघाडीवर
9.26 AM
मुंब्रामधून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आघाडीवर
9.25 AM
गुहागर राष्ट्रवादीचे भास्कर जाधवांची १० हजारांची आघाडी
9.24 AM
पनवेलमध्ये शेकापाचे बाळाराम पाटील 6000 मतांनी आघाडीवर
9.23 AM
रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत 5000 मतांनी आघाडीवर
9.22 AM
अंधेरीतून काँग्रेसचे सुरेश शेट्टी आघाडीवर
9.21 AM
धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड तिसऱ्या फेरीनंतर आघाडीवर
9.20 AM
मुलुंडमध्ये भाजपचे सरदार तारासिंग आघाडीवर
9.15 AM
दहीसरमध्ये शिवसेनेचे विनोद घोसाळकर आघाडीवर
9.15 AM
कल्याण ग्रामीणमध्ये मनसेला धक्का, सुभाष भोईर यांची आघाडी
9.13 AM
धारावी वर्षा गायकवाड (काँग्रेस) दुसऱ्या फेरीनंतर आघाडीवर
9.12 AM
अंबरनाथमधून शिवसेनेचे बालाजी किणीकर 1565 मतांनी आघाडीवर
9.11 AM
शहापूरमधून शिवसेनेच दौलत दरोड आघाडीवर
9.10 AM
कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेचे सुभाष भोईर 8000 मतांनी आघाडीवर
9.07 AM
माहिममधून शिवसेनेचे सदा सरवणकर आघाडीवर, मनसेचे नितीन सरदेसाई पिघाडीवर
9.05 AM
मागाठणेतून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आघाडीवर
9.02 AM
महाड शिवसेेनेचे भरत गोगावले आघाडीवर, काँग्रेसचे माणिक जगताप पिघाडीवर
8.58 AM
बेलापूरमधून शिवसेनेचे विजय नाहाटा 610 मतांनी आघाडीवर, भाजपच्या मंदा म्हात्रे दुसऱ्या तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक तिसऱ्या क्रमांकावर
8.55 AM
काँग्रेस नेते नारायण राणे पुन्हा पिघाडीवर
8.55 AM
बोरीवलीतून भाजपचे विनोद तावडे आघाडीवर
8.55 AM
ऐरोलीतून शिवसेनेचे विजय चौगुले 2806 मतांनी आघाडीवर
8.55 AM
कणकवलीतून काँग्रेसचे नितेश राणे 1400 मतांनी आघाडीवर
8.54 AM
पनवेलमधून शेकापाचे बाळाराम पाटील 1900 मतांनी आघाडीवर
8.51 AM
राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी आघाडीवर
8.48 AM
रत्नागिरीतून शिवसेनेचे उद्य सामंत आघाडीवर
8.48 AM
कणकवलीतून काँग्रेसचे नितेश राणे आघाडीवर
8.48 AM
गुहागरमधून राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आघाडीवर
8.47 AM
कल्याण ग्रामीणमधून शिवसेवसेनेच सुभाष भोईर 3000 मतांनी आघाडीवर
8.46 AM
बेलापूरमधून राष्ट्रवादीचे गणेश नाईक पिघाडीवर, शिवसेनेचे विजय नाहटा आघाडीवर
8.45 AM
घाटकोपरमधून भाजपचे राम कदम आघाडीवर
8.44 AM
घाटकोपरमधून भाजपचे राम कदम आघाडीवर
8.42 AM
मनसेचे बाळा नांदगावकर पिघाडीवर, शिवसेनेचे अजय चौधरी आघाडीवर
8.40 AM
ऐरोलीमधून भाजपचे वैभव नाईक आघाडीवर
8.34AM
सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर
8.33 AM
बेलापूरमधून शिवसेनेचे विजय चौगुले
8.33AM
ऐरोलीमधून राष्ट्रवादीचे संदीप नाईक आघाडीवर
8.31AM
बेलापूरमधून शिवसेनेचे विजय चौगुले
8.30AM
कल्याण पूर्वमधून अपक्ष गणपत गायकवाड आघाडीवर
8.28 AM
पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव होईल - नवाब मलिक
8.21 AM
कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक 280 मतांनी आघाडीवर
8.20 AM
काँग्रेस नेते नारायण राणे पिछाडीवर, शिवसेनेचे वैभव नाईक आघाडीवर
8.00 AM
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरुबाड येथे मतमोजणीला सुरुवात
7.30 AM
कोकणात टपाली मतमोजणीला सुरुवात
7.20 AM
मतमोजणीला सुरुवात
LIVE UPDATE - 6.30 AM
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुंबई - ठाणे - कोकण या विभागात भगवी लाट येण्याची शक्यता अधिक आहे. ठाणे आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी शिवसेनेला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई - ठाणे - कोकणमध्ये शिवसेना जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी, शेकाप आणि काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. तर भाजपचे कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालाकडे लक्ष लागले आहे.
मुंबईत याआधी शिवसेनेला केवळ चारच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता किती जागांवर सेना बाजी मारते आणि मनसे प्रगती करते की आपल्या जागा गमावते याकडे लक्ष लागले आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस किती जागा घेणार याचीही उत्सुकता आहे. मोदी लाट मुंबई, ठाण्यात दिसणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सिंधुदुर्गात कणकवली आणि कुडाळमध्ये सर्वाधिक लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते नारायण राणे, सावंतवाडीत दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीत उदय सामंत, गुहागरात भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.