सहा नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करणार?

मुंबईत भाजपची सत्ता स्थापन करण्याची तयारी दिसून येत आहे. राजनाथ सिंह मुंबईत दाखल झाले आहेत, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित असल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Oct 29, 2014, 07:45 AM IST
सहा नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करणार? title=

मुंबई : मुंबईत भाजपची सत्ता स्थापन करण्याची तयारी दिसून येत आहे. राजनाथ सिंह मुंबईत दाखल झाले आहेत, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित असल्याचं सांगण्यात येतंय.

संध्याकाळी ०८ .०० वाजता

देवेंद्र फडणवीस हे सहा तारखेला बहुमत सिद्ध करणार आहेत, तर ३१ ऑक्टोबर रोजी ६ जणांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

संध्याकाळी ७.३० वाजता

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रात ३१ ऑक्टोबर रोजी शपथविधी करण्याचा उल्लेख केलेला आहे, राज्यपालांनी शपथविधीनंतर पुढील १५ दिवसात बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे.

संध्याकाळी ६.३०  वाजता

देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल

दुपारी ०४.५५ वाजता

* देवेंद्र फडणवीस राजभवनात जाऊन राज्यपालांची घेणार भेट... सत्ता स्थापनेचा करणार दावा
* ३१ तारखेला छोटंसं मंत्रिमंडळ बनेल - जे. पी. नड्डा
* आमची इच्छा आहे की, शिवसेनेनं आमच्यासोबत यावं... त्यामुळे, चर्चा सुरु राहील आणि त्याचं योग्य फळ मिळेल - - जे. पी. नड्डा

दुपारी ०४.३५ वाजता

* भाजप आज सायंकाळी सहा वाजता सरकार स्थापन करण्याचा दावा करणार
* सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सायंकाळी सहा वाजता राजभवनावर जाणार आहेत - राजीव प्रताप रूडी 
* आठवडाभराच्या आत देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

दुपारी ०४. २७ वाजता

देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सूचक एकनाथराव खडसे होते, तर सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन दिलं आहे.

दुपारी ४.१५ वाजता

* एकनाथ खडसे आमचे वरिष्ठ नेते, ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते - रुडी
* विधानभवनात विधीमंडळ गटनेत्याची निवड होईल, त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा करु - रुडी
* विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली - राजीव प्रताप रुडी

दुपारी ४.०० वाजता

* नवनिर्वाचित आमदार विधान भवनात
* भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक सुरु
* नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा थोड्याच वेळात
* भाजपचे सर्व आमदार विधिमंडळात दाखल
* विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे यांच्यासह राजनाथ सिंह, जे.पी. नड्डादेखील उपस्थित
* शिवरायांच्या पुतळ्याला आमदारांचं अभिवादन

 

विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होणार, फेटे बांधून भाजपचे आमदार विधिमंडळाकडे (UPDATE 15.14 PM)

आज भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे, यात नेता निवडला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय, भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडण्याआधी, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगून मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. 

यामुळे भाजप नेत्यांची धावाधाव होत असल्याचं सांगण्यात येतंय. भाजपचे राष्ट्रीय नेते राजीव प्रताप रूडी यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली असल्याचं सांगण्यात येतंय.

दुसरीकडे सरकारला शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय, तर राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यावर विचार करणार असल्याचं भाजपने म्हटलंय. भाजपच्या सर्व आमदारांनी भगवे फेटे बांधले आहेत, सर्व आमदार आता विधिमंडळाकडे निघाले आहेत.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.