जळगाव : खानदेशात राजकीय दृष्ट्या जळगांव जिल्हा हा महत्वपूर्ण मानला जातो. कारण विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचा हा जिल्हा आहे. जिल्ह्यात सध्या जास्तच जास्त ठिकाणी चौरंगी लढती आहे. या जिल्ह्यात आधीपासून भाजपचं प्राबल्य राहिलं आहे. लोकसभेसाठी दोन्ही जागा भाजपच्याच आल्या आहेत.
अमळनेरात मात्र मागील पंचवार्षिकला केलेली चूक भाजपला यावर्षीही भोवण्याची चिन्हं आहेत. कारण सतत तीन वेळेस भाजपकडून विजयी असलेले आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचं तिकीट मागील वेळेस कापण्यात आलं होतं. यानंतर अपक्ष उमेदवार साहेबराव पाटील यांचा विजय झाला होता. आता अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचं प्राबल्य वाढलं असल्याचं सांगण्यात येतंय.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे आमदार आणि पालकमंत्रीपद भूषवलेले संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असला तरी राष्ट्रवादी आता काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
जळगाव जिल्ह्यातील पक्ष निहाय उमेदवारांची यादी
मतदारसंघ |
काँग्रेस |
राष्ट्रवादी |
भाजपा |
शिवसेना |
मनसे |
जळगाव शहर |
डॉ.राधेश्याम चौधरी |
मनोज चौधरी |
राजू भोळे |
सुरेशदादा जैन |
ललित कोल्हे |
जळगाव ग्रामीण |
डी.जी.पाटील |
गुलबराव देवकर |
पी.सी.पाटील |
गुलाबराव पाटील |
मुकुंदा रोटे |
जामनेर |
जोस्त्ना विसपुते |
डी.के.पाटील |
गिरीश महाजन |
सुभाष तंवर |
विलास राजपूत |
भुसावळ |
पुष्पा सोनवणे |
राजेश झाल्टे |
संजय सावकारे |
संजय ब्राह्मणे |
रामदास सावकारे |
रावेर/यावल |
गिरीश चौधरी |
गफ्फार मलिक |
हरिभाऊ जावळे |
प्रल्हाद महाजन |
जुगल पाटील |
मुक्ताईनगर |
योगेंद्रसिंग पाटील |
अरूण पाटील |
एकनाथ खडसे |
चंद्रकांत पाटील |
इतबार तडवी |
चाळीसगाव |
अशोक खलाणे |
राजीव देशमुख |
उन्मेष पाटील |
रामदास पाटील |
राकेश जाधव |
पाचोरा/भडगांव |
प्रदीप पवार |
दिलीप वाघ |
उत्तमराव महाजन |
किशोर पाटील |
डी.एम.पाटील |
अमळनेर |
गिरीश पाटील |
साहेबराव पाटील |
अनिल भा.पाटील |
अनिल अं.पाटील |
|
चोपडा |
ज्ञानेश्वर भादले |
माधुरी पाटील |
जगदीश वळवी |
प्रा.चंद्रकांत सोनवणे |
इतबार तडवी |
एरंडोल/पारोळा |
डॉ.प्रवीण पाटील |
डॉ.सतीश पाटील |
मच्छिंद्र पाटील |
चिमणराव पाटील |
नरेंद्र पाटील |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.