मुंबई : भाजपने राज्यात चांगले प्रदर्शन केले आणि १२२ जागा पटकावल्या. मात्र, बहुमत न मिळाल्याने भाजपला दुसऱ्या पक्षांवर अबलंबून राहावे लागणार आहे. निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला तात्काळ पाठिंबा जाहीर केला. मात्र, या पाठिंब्यामागे ती फाईल तर नाही ना, अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर आला असला तरी सरकार स्थापनेसाठी आवश्यक २२ आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रश्न पक्षापुढे उभा राहिला आहे. मात्र, राष्ट्रवादीने घाईघाईत विनाशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला नॅशनल करप्ट पार्टी असा उल्लेख केला. असे असताना राष्ट्रवादीने पाठिंबा देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामागे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची चौकशी होण्याची फाईल असू शकते. या दोन नेत्यांबाबत ४१ दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या टेबलावर धूळ घात असलेली चौकशीची फाईल. ही फाईल पुढे येऊ नये म्हणून राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याचे म्हटले जात आहे.
राज्याच्या भ्रष्टाचार विरोधी एजन्सीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी २२ ऑगस्ट रोजी राज्याच्या गृहमंत्रालया या दोन्ही नेत्यांची खुली चौकशी करण्याची मागणी गेली होती. तर समाजसेवक प्रवीण वाटेगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी जलसंपदा योजनेच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा ठपका तसेच आरोप करण्यात आलाय. हे सर्व बाहेर येऊ नये, म्हणून ही राष्ट्रवादीची खेळी असल्याचे म्हटले जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.