मुंबई : भाजचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला बरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल दिल्लीत भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. पंतप्रधन नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तीन तास चर्चा झाली.
७ कॅबिनेट मंत्रीपदांसह किमान १४ मंत्रीपदे मिळावीत, असा प्रस्ताव शिवसेनेनं दिल्याचं वृत्त आहे. त्यापैकी दोघांचा शपथविधी ३१ ऑक्टोबरला व्हावा, असा सेनेचा आग्रह आहे. मात्र भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांनी ही शक्यता फेटाळून लावलीय. त्यामुळं नाराज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
मंत्रीपदं मिळणार नसतील तर शपथविधीलाही जायचं नाही, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.