मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला शिवसेनेची अनुपस्थिती

राज्यातील भाजपच्या पहिल्या वहिल्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. भाजपकडून शिवसेनेला मानसन्मान मिळत नसल्याने तेथे जायचेच कशाला, असा संताप शिवसेनेच्या आमदारांमध्ये असल्याचे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. आजच्या सोहळ्यात शिवसेनेचे आमदार, खासदार कुणीच उपस्थित राहणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Updated: Oct 31, 2014, 07:56 AM IST
मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला शिवसेनेची अनुपस्थिती title=

मुंबई : राज्यातील भाजपच्या पहिल्या वहिल्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. भाजपकडून शिवसेनेला मानसन्मान मिळत नसल्याने तेथे जायचेच कशाला, असा संताप शिवसेनेच्या आमदारांमध्ये असल्याचे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. आजच्या सोहळ्यात शिवसेनेचे आमदार, खासदार कुणीच उपस्थित राहणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांच्या दिल्लीत गाठीभेटी
मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते नवी दिल्लीत दाखल झालेत. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली, तर ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. दुपारी फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत स्नेहभोजनही घेतले. यावेळी दोघांमध्ये महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा झाल्याचे समजते.

ऐनवेळीच मंत्र्यांची यादी 
हरियाणात खत्तर मंत्रिमंडळाची यादी शपथविधीपूर्वी दोन तास आधी जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्रातही तेच धक्कातंत्र राबवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून शहा यांच्या कार्यालयात सीलबंद पाकीट पडून असल्याचे बोलले जात आहे. हे पाकीट आज सकाळी फडणवीस यांच्या ताब्यात देण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. तर मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या सर्वांनाच वानखेडेवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.