आता जनतेची खरंच सटकली पाहिजे- अजित पवार

विधासभा निवडणुकीत यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामुळं आता स्थानिकांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळेल, पक्ष संघटना मजबूत करता येईल. 

Updated: Sep 28, 2014, 08:35 PM IST
आता जनतेची खरंच सटकली पाहिजे- अजित पवार title=

मुंबई: विधासभा निवडणुकीत यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामुळं आता स्थानिकांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळेल, पक्ष संघटना मजबूत करता येईल. 

पण सध्या जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे प्रकार सुरू आहे, त्यामुळं मतदान करणाऱ्या जनतेची खरोखरंच सटकली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळं एकहाती सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. आम्ही केलेल्या कामाचं मार्केटिंग झालं नाही, सत्ता द्या पारदर्शक कारभार करून दाखवू, मी भ्रष्टाचार करणार नाही, कोणाला करू देणार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलंय. 

भारतीय जनता पक्षाबद्दल बोलतांना अजित पवार म्हणाले की, मोदींची लाट होती पण आता नाहीय, लाट ही ओसरतेच. मात्र त्याचवेळी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होणाबद्दल आपला आक्षेप नसेल, असं दादांनी स्पष्ट केलं. 

कारण जनतेनं कौल दिला तर तो कोणत्या जाती-धर्माचा आहे, हे लक्षात न घेता त्याची निवड व्हायला हवी, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.