राज ठाकरे आणि नितिन गडकरींच्या भेटीची शक्यता

राज ठाकरे आणि नितिन गडकरी यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमरावतीत एकाच हॉटेलात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी उतरले आहेत. 

Updated: Sep 30, 2014, 11:22 AM IST
राज ठाकरे आणि नितिन गडकरींच्या भेटीची शक्यता title=

अमरावती : राज ठाकरे आणि नितिन गडकरी यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमरावतीत एकाच हॉटेलात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी उतरले आहेत. 

मात्र हे दोन्ही नेते एकमेकांना भेटतील का असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी नितिन गडकरी यांनी नाशिकमधील मनसेच्या गोदापार्कच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली होती. 

या दोन्ही नेत्यांचे संबंध सोहार्दपूर्ण असल्याचं सांगण्यात येतं, त्यामुळे हे नेते भेटतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मात्र आता निवडणूक काळात राज ठाकरे आणि नितिन गडकरी यांची भेट झाल्यास कोणत्या तरी एका पक्षावर गंभीर तर एका पक्षासाठी सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.