अमित, नरसिंग पराभूत

भारताच्या अमित कुमारला ५५ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या व्लादिमीरने २-० असे पराभूत केले. तर नरसिंग यादवला कॅनडाच्या कुस्तीपट्टूने पराभूत केले

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 10, 2012, 06:38 PM IST

www.24taas.com, लंडन
इराणच्या पहेलवानला पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणाऱया अमित कुमारला जॉर्जियाच्या व्लादिमीरने पराभवचा झटका दिला. आता व्लादिमीर फायनलमध्ये गेला तर अमितला ब्राँझ पदकासाठी लढत करता येईल.
तर ७४ किलो वजनी गटात भारताच्या विशेषतः मुंबईच्या नरसिंग यादवला पराभवाचा धक्का बसला आहे. त्याला कॅनडाच्या मॅथ्यू जेन्ट्री पराभूत केले आहे.

अमितचा पहिला सामना -

भारताच्या अमित कुमारने ५५ किलो वजनी गटात इराणच्या राहिनी हसन याला २-१ ने हरवत. क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता अमित कुमारला तीन सामने जिंकल्यावर पदक निश्चित आहे.
पहिले सत्र
कुस्तीचे पहिले सत्र इराणच्या राहीनी हसने १-० ने जिंकला होता. आघाडी घेतली होती.

दुसरे सत्र
दुसऱ्या सत्रात दोन्ही कुस्तीपट्टूनी चांगला बचाव करत २ मिनिटांच्या सत्रात कोणालाही अंक मिळू दिला नाही. त्यानंतर टॉस करण्यात आला. टॉस भारताच्या बाजूने आला. त्यावेळी अमित कुमारने चांगली कामगिरी करत अंक आपल्या पदरात पाडून घेतला त्यामुळे सामना १-१ अशा बरोबरीत आला
तिसरे सत्र
तिसऱ्या सत्रात पहिल्या मिनिटात राहिनी हसन एक अंक मिळवून आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या मिनिटांच्या सुरूवातीलाच आणखी एक अंक घेत अमित कुमारने विजय निश्चित केला. त्यामुळे तिसऱ्या सत्रात शेवटचा अंक मिळविणारा कुस्तीपट्टू विजयी ठरतो. तसेच अमितने केले आणि सामना खिशात घातला.