पहा लैंगिक समस्येत का होतेय वाढ

लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

Updated: May 30, 2013, 10:09 AM IST

www.24taas.com
लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. पुरुषाची लैंगिक संबंध करण्याची इच्छा कमी होत चालली आहे. प्रत्येक पुरुष कायम सेक्सबाबत विचार करीत असतो, तसेच प्रेम करण्यास व स्वीकारण्यास कधीही तयार असतो, असे मानले जाते.
नुकत्याच केलेल्या ऑनलाईन पाहणीत आढळून आले आहे की, ६२ टक्के पुरुष आपल्या महिला पार्टनरच्या तुलनेत सेक्स करण्याबाबत मागे राहतात. ही पाहणी यूकेमेडिक्स डॉट कॉम फार्मसीने केली आहे. या पाहणीतील प्रत्येक तिस-या पुरुषाने सांगितले की, पहिल्यापेक्षा त्याची दिवसेंदिवस सेक्स करण्याची इच्छा कमी होत चालली आहे.
सेक्स सर्वेक्षणानंतर हे दिसून आले होते की, सेक्समध्ये व शारीरिक संबंधाबाबत समाधान व्यक्त करण्याचा आकडा २७ टक्क्यांनी घसरला, घटला आहे. दुस-या एका पाहणीत आढळून आले होते की, प्रत्येक चार पुरुषांपैकी एक जण सेक्सच करीत नाही. ५५ वर्षांच्या पुढील वयोगटातील ४२ टक्के पुरुषांना सेक्सबाबत समस्या असल्याचे आढळून आले. ब्रिटनमधील कामसंबंधातील विशेषतज्ञ डॉ. डेविड एडवड्र्स यांच्या माहितीनुसार, सेक्स संबंध कमी झाल्यास एका व्यक्तीचे सामान्य जीवन व त्याचे नातेसंबंध धोकादायक स्थितीत पोहचतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.