लैंगिक जीवनातील समस्या अनेक रोगांना निमंत्रण

शहरातले गजबजलेले आणि धावपळीतले जीवन जगत असताना, जे व्यावसायिक आणि कार्यालयीन दैनंदिनीत अडकून पडतात त्यांना स्वत:च्या कामभावनेसाठी वेळ मिळत नाही.

Updated: May 9, 2013, 09:45 AM IST

www.24taas.com
शहरातले गजबजलेले आणि धावपळीतले जीवन जगत असताना, जे व्यावसायिक आणि कार्यालयीन दैनंदिनीत अडकून पडतात त्यांना स्वत:च्या कामभावनेसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लोक वायग्रासारख्या पर्यायांकडे वळताना दिसतात.
हा पर्याय अगदी सहज उपलब्ध असतो. अनेकदा लोक या विषयातील ज्ञान आणि तंत्र शिकण्यासाठी सेक्स क्लिनिकचा दरवाजा ठोठावतात. पण, त्यात त्यांना जर एखाद्या गोळीने फरक पडत असेल तर त्या पर्यायाला अधिक लोकप्रियता मिळते. भारतात वायग्रा २००५च्या सुमारास दाखल झाले. सुरुवातीला या गोळ्यांची उपलब्धता समस्या ठरली. पण, नंतर सगळे सुरळीत झाले.
जर तुमच्यात पुरेशी कामेच्छा उत्पन्न होत नसेल तर होमियोपॅथीचा पर्यायही खुला आहे. अॅलोपथीपेक्षा होमियोपॅथी उपचार पद्धती वेगळी आहे. हॉमियोपॅथीत रुग्णाला लगेच आराम मिळू शकत नाही.`जर आपण एखाद्या आजाराच्या मुळाशी जायचे ठरवले तर वायग्रासारखे पर्याय रक्तप्रवाह वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात. पण, जर लैंगिक भावना वाढवण्यासाठी अशा पर्यायाचा जास्त उपयोग केल्यास डोकेदुखी, रक्तस्राव आणि हृदयविकार जडण्याची शक्यता असते.`

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.