First Look : हॉलिवूडमध्ये दीपिकाचा विन डिझेलसोबत

आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही हॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. 

Updated: Feb 5, 2016, 04:13 PM IST
First Look : हॉलिवूडमध्ये दीपिकाचा विन डिझेलसोबत title=

मुंबई : आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही हॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.

XXX: The Return of Xander Cage या चित्रपटी जबरदस्त चर्चा आहे. या चित्रपटात ती वेन डिझेल हा काम करणारा आहे.

या चित्रपटाचा फर्स्ट लूक वेन डिझेल याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

 

डीजे कारूसो हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. यात डिझेल हा  Xander Cageच्या भूमिकेत दिसणार आहेत तर दीपिका सेरिना च्या भूमिकेत दिसणार आहे. फिल्मच्या शुटिंग सेटवर दीपिका आणि वेन डिझेल यांचा फोटो काढण्यात आला. त्याला वेनने कॅप्शनही दिले आहे.  फोटो शेअर करून त्याने लिहिले की, झेंडर आणि सेरिनाच्या शुटिंगचा पहिला दिवस, १७ मिलियन फॅन्सला प्रेमासाठी धन्यवाद. 

 

First day of filming... Xander and Serena... P.s. 17 million beautiful souls. Thanks for the love.

A photo posted by Vin Diesel (@vindiesel) on

दीपिकाने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात काही अॅक्शन सिक्वेन्समध्ये ती दिसणार आहे. यासाठी तीने वेट ट्रेनिंग आणि हाय प्रोटिन घेतले आहे.