मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनला साडी शोभून दिसते असे तिचे फॅन्स म्हणतात, आणि विद्या बालनचाही नेहमी साडी नेसण्यावर भर असतो, म्हणूनच की काय विद्याने आज सांगून टाकलंय, महिलांनी साडीच नेसावी.
विद्याचे साडी या पारंपारिक पोशाखावर असलेले प्रेम सर्वांना माहित आहे. विद्या केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसण्यास प्राधान्य देते. भारतातील महिलांनी साडीला प्राधान्य द्यावे, असे विद्याचे म्हणणे आहे. मुंबईतील कुमारास्वामी हॉल येथे या साड्यांचे प्रदर्शन सुरु आहे.
आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि पारंपारिकता या दोन गोष्टींची योग्य जोडणी करुन तयार करण्यात आलेल्या या साड्यांची विद्याने प्रशंसा केली. ती म्हणाली की, ‘वाया’ ब्रँण्डअंतर्गत तयार केलेल्या साड्या महिलांना साडी नेसण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आहेत.
जेणेकरून, केवळ ठराविक कार्यक्रमाला साडी न नेसता इतरवेळीही महिला साडीला प्राधान्य देतील. कोणत्याही वयोगटातील महिलांवर या साड्या खुलून दिसतील हाच विचार लक्षात घेऊन या साड्या डिझाइन करण्यात आलेल्या आहेत.