मुंबई : अभिनेता सचिन पिळगांवकर यांना पुण्यातील एका महिलेनं ३५ लाख रुपयांना गंडा घातल्याचे पुढे आलेय.
कमी किंमतीत अलिशान कार घेवून देण्याचे आमिष दाखवून त्या महिलेने आपली फसवणूक केल्याची तक्रार सचिन पिळगावकर यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
पाचगणीत एका खेळाच्या कार्यक्रमात त्या महिलेशी सचिन पिळगांवकर यांची ओळख झाली होती. त्यावेळी त्या महिलेने मुंबई, पुण्यातील कार डिलरशी आपली ओळख असल्याचं सचिन यांना सांगितलं होतं. तसेच कमी किंमतीत अलिशान कार मिळवून देण्यासाठी मदत करण्याची तयारी त्या महिलेनं दाखवल्याचं सचिन यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणी मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात त्या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्याला फसविल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.