टीव्हीवर वारंवार सूर्यवंशम हा सिनेमा का दाखवला जातो...जाणून घ्या कारण

चॅनेल सर्फ करताना आपल्याला एक चित्रपट टीव्हीवर नेहमी दिसतो तो म्हणजे सूर्यवंशम. हा चित्रपट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात दाखवला गेलाय. 

Updated: Dec 17, 2016, 11:38 AM IST
टीव्हीवर वारंवार सूर्यवंशम हा सिनेमा का दाखवला जातो...जाणून घ्या कारण title=

मुंबई : चॅनेल सर्फ करताना आपल्याला एक चित्रपट टीव्हीवर नेहमी दिसतो तो म्हणजे सूर्यवंशम. हा चित्रपट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात दाखवला गेलाय. 

सिनेमातील अनेक पात्रे म्हणजेच हीरा ठाकूर, राधा, गौरी आणि मेजर रंजीत यांची नावे तसेच सिनेमातील डायलॉग लोकांना अक्षरश: पाठ झालेत. सोशल मीडियावर तर हा सिनेमा पुन्हा पुन्हा दाखवण्यावरुन जोक्सही झालेत. दरम्यान हा सिनेमा टीव्हीवर वारंवार का दाखवला जातो याचे कारण समोर आलेय.

खरंतर, सेट मॅक्स म्हणजेच आताचे सोनी मॅक्स या चॅनेलवर हा सिनेमा दाखवला जातो. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोनी मॅक्सने सूर्यवंशम या सिनेमाचे अधिकार 100 वर्षांसाठी विकत घेतलेत. त्यामुळे या चॅनेलवर हा सिनेमा वारंवार दाखवला जातो, असे म्हटले जातेय. 

तसेच हा सिनेमा वारंवार दाखवण्याचे आणखी एक कारणही असू शकते ते म्हणजे हा सिनेमा 1999मध्ये आला होता आणि तेव्हाच हे चॅनेल लाँच झाले होते.