मुंबई : बिग बॉसमध्ये ज्या स्पर्धकांना स्वत:हून बाहेर पडायचं असेल तो बाहेर पडू शकतो अशी ऑफर देण्यात आली होती. रिमी सेन ही बाहेर पडण्याच्या तयारीत होती पण ती बाहेर पडलीच नाही.
असं काय झालं ज्यामुळे रिमी सेनने बाहेर पडण्याचा निर्णय मागे घेतला असेल.
रिमी सेन जर स्वत:हून बाहेर पडली तर तिला आर्थिक नुकसान होऊ शकतं. बिग बॉसने रिमीला स्पर्धेत येण्यासाठी 2 कोटींची ऑफर दिली होती. पण जर आता रिमी सेन स्वत:हून बाहेर पडली असती तर तिला फक्त 20 टक्के रक्कम मिळणार होती. त्यामुळे तिने स्वत:हून बाहेर पडण्याचा निर्णय मागे घेतला.
रिमी जर शोमधून एलिमिनेट झाली तर तिला 2 कोटी रुपये मिळतील पण बिग बॉसलाही तिला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही. कारण रिमी ही बिग बॉसमधली महत्त्वाची स्पर्धक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.