मुंबई : शाहरूख खान आणि काजोलच्या दिलवाले चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. या सिनेमात वरूण धवन आणि कृती सेनन हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
कृती सेनन जेव्हा विमानाने दिल्लीहून मुंबईला येत होती, तेव्हा प्रवासादरम्यान तिने पाहिले की एका प्रवासी पायरायटेड फुटेजने दिलवाले सिनेमा पाहतोय, हे पाहून कृती भडकली आणि तिचा राग तिने ट्वीटरवर व्यक्त केला.
तिचं ट्वीट पाहून शाहरूखचं प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीजच्या एका पीआरओनेही पायरसी हा कायदेशीर गुन्हा असल्याचं सांगितलं.