मुंबई: बॉलिवूडमध्ये सीरियल किसर म्हणून इम्रान हाश्मी प्रसिद्ध आहे. मात्र इम्रानसोबत काम केलं तर, तुझ्याशी लग्न कोण करणार? असा सवाल अभिनेत्री अमायरा दस्तूरच्या आईनं तिला विचारला आहे.
प्रतिक बब्बरसोबत 'इसक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या अमायरा इम्रानसोबत 'मिस्टर एक्स' सिनेमात दिसणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, 'मिस्टर एक्ससाठी मी ऑडिशन दिलं होतं. यानंतर विक्रम भट यांनी माझी निवड केली. चित्रपटात माझा हिरो कोण असेल याची मला सुतरामही कल्पना नव्हती. काही दिवसांनी इम्रान हाश्मी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असल्याचं समजलं' असं अमायरा म्हणाली.
मी इम्रान हाशमीसोबत काम करणार आहे हे आईला कळल्यावर तुझ्याशी लग्न कोण करणार? असा मोठा प्रश्न तिला पडला होता असं अमायरा आठवणीनं सांगते. बाबांनीही इम्रान सोबत काम करताना भरपूर सल्ले दिले. घरच्यांची समजूत काढल्यावर मी चित्रपटाचं शूटिंग सुरु केलं, असंही तिनं स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.