सनी लिऑनची सुट्टी करणार : राखी सावंत

आयटम गर्ल राखी सांवत एका नवीन अल्बमद्वारे पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आपण सनी लिऑनची सुट्टी करणार असल्याची घोषणा राखीनं केलीय. 

Updated: Apr 16, 2015, 07:27 PM IST
सनी लिऑनची सुट्टी करणार : राखी सावंत title=

मुंबई: आयटम गर्ल राखी सांवत एका नवीन अल्बमद्वारे पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. आपण सनी लिऑनची सुट्टी करणार असल्याची घोषणा राखीनं केलीय. 

मी सनीपेक्षा चांगला डान्स करते, असंही राखीने सांगितलं. तसंच राखीनं सनीला चॅलेंजही केलं की, सनीनं माझ्याशी टक्कर घेऊन दाखवावी. तसंच दुसरीकडे सनीच्याच गाण्यावर डान्स करून सगळ्यांची वाहवाह ही मिळवली. तसंच अल्बमच्या निर्मात्यांनीही राखीकडून डान्स करवून घेतला. 

याआधीपासूनच राखी सनीवर अशी भडकली आहे. राखीची तक्रार आहे की सनीमुळं माझ्यासारख्या अनेक अभिनेत्रींची मागणी कमी झाली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.