कधी येणार 'शांताबाई'चं अधिकृत व्हिडीओ साँग

शांताबाई या गाण्याने सोशल नेटवर्किंगवर अनेक विक्रम मोडित काढले आहेत. शांताबाई या गाण्यावर यू-ट्यूब तसेच व्हॉटस अॅपवर भलताच डान्स मॅच करून व्हिडीओ पसरवला जात आहे. अर्थात आता शांताबाई गाण्यावरील डान्सचा फॉर्मेट किंवा अधिकृत व्हिडीओची निर्मिती करण्याची वेळ आली आहे.

Updated: Oct 12, 2015, 11:39 AM IST
कधी येणार 'शांताबाई'चं अधिकृत व्हिडीओ साँग title=

पुणे : शांताबाई या गाण्याने सोशल नेटवर्किंगवर अनेक विक्रम मोडित काढले आहेत. शांताबाई या गाण्यावर यू-ट्यूब तसेच व्हॉटस अॅपवर भलताच डान्स मॅच करून व्हिडीओ पसरवला जात आहे. अर्थात आता शांताबाई गाण्यावरील डान्सचा फॉर्मेट किंवा अधिकृत व्हिडीओची निर्मिती करण्याची वेळ आली आहे.

अर्थात शांताबाईचं अधिकृत व्हिडीओ साँग यू-ट्यूबला आणण्यासाठी सुमित म्युझिकला पुढाकार घ्यावा लागणार आहे. तसेच संगीतकार, गीतकार संजय लोंढे यांचीही या व्हिडीओ साँगमध्ये भूमिका महत्वाची ठरणार आहे.

यू-ट्यूबच्या महत्वाच्या संगीत व्हिडीओंमध्ये शांताबाईचा व्हिडीओ ट्रेडिंग आहे, शांताबाई गाण्याचं जर अधिकृत व्हिडीओ साँग आलं तर आणखी धमाल होणार आहे. यामुळे एखाद्या अभिनेत्रीला पुन्हा नावारूपाला येण्याची संधी आहे.

शांताबाई गाण्यातील भाषा ज्यांना कळत नाही, त्या राज्यातही संगीताच्या तालावर शांताबाई लोकप्रिय झाली आहे. ज्याप्रमाणे कोलावरी-डी आणि कोडाईकनालचं प्रोटेस्ट साँग लोकप्रिय झालं होतं, त्याप्रमाणे शांताबाई लोकप्रिय झाली आहे.

पाहा शांताबाई प्रमाणे लोकप्रिय झालेली काही गाणी
शांताबाई

कोलावरी-डी

कोडेकनाल वॉन्ट

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.