नवी दिल्लीः तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. पण ही बाब खऱी आहे. चक्क, बिग बी अमिताभ रेल्वे स्टेशनवर हरवले होते. ही कबुली अमिताभ बच्चन यांनीच दिलेय.
71 वर्षीय अभिनेते बिग बी यांनी खूप जुनी आठवण आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे. आपण कसे तुडुंब भरलेल्या गर्दीत रेल्वे स्टेशनवर हरवलो होतो ते. आम्ही माझ्या आजी- आजोबांना भेटण्यासाठी इलाहाबादच्या ट्रेनने कराचीला जात होतो. त्यावेळी मी केवळ 2 वर्षाचे होतो. माझ्यासोबत माझे आई-बाबा होते.
इलाहाबादपासून कराचीपर्यंतच्या प्रवासासाठी दोन दिवस लागत असे. आजोबांनी इंग्लंडवरुन बार-एट-लॉ केले होते आणि ते कराचीमध्ये राहत होते. त्यांना भेटण्यासाठी आम्ही जाण्याचे ठरविले. त्यावेळची ही गोष्ट आहे. आम्ही घरी येण्याच्यावेळी आम्हाला ट्रेन बदलावी लागत असे. त्यावेळी मी माझ्या वडिलांचा हात पकडून चालत होतो. मी हात सोडला. ही बाब गर्दीमुळे बाबांच्या लक्षात आली नाही. मात्र, बाबांबरोबर मी नाही, हे आईला समजले. त्यावेळी प्रचंड गर्दीमुळे माझे आई-बाबांची काळजी वाढली. मुलगा कुठे दिसत नाही म्हटल्यावर त्यांच्या पाया खालची वाळू घसरली. मला शोधण्यासाठी प्रयत्न केला. शेवटी न राहून त्यांनी जोर जोरात आवाज दिला. मला हाका मारत होते. काही प्रवाशांना थांबवून तुम्ही कोठे दोन वर्षांचा मुलगा पाहिला का?
माझ्या शोध सुरु होता. त्यावेळी एका प्रवाशांने माझ्या आई-बाबांना सांगितले की, एक दोन वर्षांचा मुलगा पुलावर पाहिला. ही माहिती मिळताच, आई-बाबांनी पुलावर धाव घेतली. त्यांना मी दिसल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. मी पुलावरून ट्रेनची मज्जा लुटत होतो.
'भूतनाथ रिटर्न्स'च्या स्टारने ब्लॉगमध्ये ट्रेनला बघतानाचा फोटो पोस्ट केलाय आणि सांगितले की, आजही मी ट्रेन जाताना बघतो. भलेही माझी इच्छा तीव्र नसेल. मात्र त्या गोष्टी लहानपणीचे दिवस आठवून देतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.