मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या एका नव्या जोडप्याची चर्चा जोरावर आहे. हे नवं जोडपं आहे अर्जुन कपूर आणि जॅकलीन फर्नांडीस...
'आयफा' अवॉर्डच्या मलेशिया ट्रीप दरम्यान या दोघांना एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतीत करताना पाहिलं गेलं. त्यानंतर या दोघांत काहीतरी शिजतंय अशी अटकळ बांधली जातेय.
अर्जुनच्या वाढदिवशीही जॅकलीन सेलिब्रिट करताना दिसली होती. यावेळी, तीची अर्जुनच्या बहिणीशी चांगलीच गट्टी जमलेली दिसत होती.
याबद्दलच जेव्हा जॅकलीनला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं, अर्जुन आणि मी खूप चांगले मित्र असल्याचं म्हटलंय. मी आजकाल हे सगळं ऐकते आणि फक्त हसते... न्यूजपेपर तर मी वाचतही नाही. माझे आजुबाजुचे लोकचं मला माहिती देत असतात असं तिनं म्हटलंय.
तसं अर्जुनचं नाव आत्तापर्यंत सोनाक्षीपासून ते मलाईका अरोरा खान हिच्यापर्यंत अनेक जणींशी जोडलं गेलंय. यात आता आणखी एक भर पडलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.