व्हिडिओ : 'बदलापूर'चं पहिलं गाणं आणि डॅशिंग वरुण!

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बदलापूर'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना त्याचा हा नवीन क्रेझी लूक भलताच आवडलाय. श्रीराम राघवनच्या या सिनेमाच्या माध्यमातून वरुणची छबीच बदलून गेलीय. 

Updated: Dec 9, 2014, 03:41 PM IST
व्हिडिओ : 'बदलापूर'चं पहिलं गाणं आणि डॅशिंग वरुण!  title=

नवी दिल्ली : वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बदलापूर'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना त्याचा हा नवीन क्रेझी लूक भलताच आवडलाय. श्रीराम राघवनच्या या सिनेमाच्या माध्यमातून वरुणची छबीच बदलून गेलीय. 

नुकतंच, याच सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 'जी करदा...' या गाण्यातील ऑडिओच नाही तर या गाण्याची ट्रिटमेंटही तुम्हाला नक्कीच नवी असलेली जाणवेल. हे गाणं कोणत्याही व्हिडिओ ट्रॅकशिवाय केवळ 'ऑडिओ'च्या रुपात प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी अगोदर घेतला होता. पण, त्यानंतर मात्र 'बदलापूर टिझर'वरच हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये ठेऊन प्रदर्शित करण्यात आलंय. 

या सिनेमात, नवाझुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी आणि यामी गौतम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २० फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.