हैदराबाद : सुपरस्टार रजनीकांतचा आगामी सिनेमा ‘लिंगा’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमात रजनीची हिरोईन आहे सोनाक्षी सिन्हा... आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाच्या मुलीसोबत रोमान्स करणं हे आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलंय.
पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर गेलो तेव्हा जेवढ घाबरलो नव्हतो तेवढं सोनाक्षीसोबत रोमान्टिक गाणं शूट करताना मी जेवढा घाबरलो होतो, असंही रजनीनं प्रांजळपणे कबुल केलंय.
रजनीकांत ‘लिंगा’च्या तेलुगू भाषेतील स्क्रिनिंग दरम्यान पत्रकारांशी संवाद साधत होते. देव जर माझ्यासारख्या ६० वर्षाच्या अभिनेत्याला मोठ्यात मोठी शिक्षा देत असेल तर ती आहे युगुल गीत गाणं... मला सोनाक्षीसोबत युगत गीत शूट करणं चालत्या ट्रेनवर स्टंट करण्याहूनही कठिण काम वाटलं.
१२ डिसेंबर रोजी पासष्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या रजनीकांत, यांनी आपण सोनाक्षीला तिच्या लहानपणापासून ओळखत असल्याचं म्हटलंय. सोनाक्षी माझ्या मुलीसोबतच मोठी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. सध्या सोनाक्षी २७ वर्षांची आहे.
केएएस रवी कुमार दिग्दर्शित ‘लिंगा’ येत्या १२ डिसेंबर रोजी म्हणजेच रजनीच्या वाढदिवसालाच प्रदर्शित होणार आहे. हा रजनीच्या प्रेक्षकांसाठी एक खूप मोठी भेट आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.