मुंबई : आत्तापर्यंत अनेक सिनेमांचे ट्रेलर तुम्ही यू ट्यूबवर प्रदर्शित झालेले पाहिले असतील. पण, आता पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होतोय तो ‘व्हॉटस् अप’वर... एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलवर आणि टॅबलेटवर हा ट्रेलर पाठवण्यात येतोय.
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘हॅपी न्यू इअर’ सिनेमाचं प्रमोशन रेड चिलीज एन्टरटेन्मेट प्रा. लि. करतंय. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक आगळा-वेगळा मार्ग निवडण्यात आलाय.
या सिनेमाचा ट्रेलर तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी तुम्हाला केवळ 9819020202 या नंबरवर एक मिस कॉल द्यायचाय. किंवा या नंबरवर एक व्हॉटसअप मॅसेज पाठवायचाय.
हा ट्रेलर 14 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे... आणि अर्थातच त्याच दिवशी तुम्हाला हा ट्रेलर अनेक मोबाईल आणि टॅबलेटवर दिसेल.
रेड चिलीज एन्टरटेन्मेटसचे सीईओ वेंकी मैसूर यांच्या म्हणण्यानुसार, भारतात 50 मिलियन व्हॉटस अप यूजर्स आहेत. जे दिवसाला लाखो व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. त्यामुळेच आम्ही व्हॉटस् अप निवडण्याचा निर्णय घेतलाय. एक ब्रॉडकास्ट मॅसेज 250 पेक्षा जास्त व्हॉटसअप यूजर्सला पाठवला जाऊ शकत नाही, हे आमच्यासमोर आव्हानच होतं. पण, व्हॉटस अपनं आमच्या कॅम्पेनसाठी ही बंदी हटवलीय.
दिवाळीत हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादूकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इरानी आणि विवान शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत... या सिनेमाचं दिग्दर्शन फराह खाननं केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.