व्हिडिओ: हॅपी न्यू इअरचं रोमॅन्टिक साँग पाहा #Manwalaage!

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची फिल्म ‘हॅपी न्यू इअर’चं दुसरं गाणं ‘मनवा लागे’ काल मध्यरात्री यू-ट्युबवर रिलीज झालं. हे एक रोमॅन्टिक मेलडी साँग आहे. जे श्रेया घोषाल आणि अरजित सिंह या सध्याच्या प्रसिद्ध गायकांनी गायलंय. तर इरशाद कामिलनं लिहिलंय. 

Updated: Sep 10, 2014, 11:38 AM IST
व्हिडिओ: हॅपी न्यू इअरचं रोमॅन्टिक साँग पाहा #Manwalaage!  title=

मुंबई: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची फिल्म ‘हॅपी न्यू इअर’चं दुसरं गाणं ‘मनवा लागे’ काल मध्यरात्री यू-ट्युबवर रिलीज झालं. हे एक रोमॅन्टिक मेलडी साँग आहे. जे श्रेया घोषाल आणि अरजित सिंह या सध्याच्या प्रसिद्ध गायकांनी गायलंय. तर इरशाद कामिलनं लिहिलंय. 

गाणं रिलीज झाल्यानंतर काहीच मिनिटांमध्ये ट्विटरवर #Manwalaage ट्रेंड करू लागलं. हे गाणं यावर्षातलं सर्वात रोमॅन्टिक गाणं असू शकतं. 

गाण्यात श्रेया घोषालचा आवाज अतिशय कर्णप्रिय वाटतो. व्हिडिओ सुद्धा दमदार आहे. यात शाहरुख आणि दीपिका रोमांस करतांना दिसतायेत. दीपिका पारंपरिक भारतीय लूकमध्ये चांगली दिसते. तर शाहरुख सुद्धा आणि ‘परफेक्ट’ 8-पॅक अॅब्समध्ये दिसतो. 

गाण्यात दीपिका आणि शाहरुखच्या भूमिकेतील पहिलं आकर्षण आणि प्रेमाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीनं दाखवलीय. दीपिका क्लासिकल डांस करतांना पण दिसते. चित्रपटातील ‘इंडिया वाले’ हे गाणं याआधीच रिलीज झालंय. 

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.