नवी दिल्ली : प्रियंका चोप्राच्या फॅन्सना झटका बसला आहे, कारण मेरी कॉम चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात शानदार कमाई केली असली तरी, या आठवड्याच्या सुरूवातीला प्रियंका चोप्रासाठी हा मोठा धक्का आहे. कारण सोमवारी केवळ 3.75 कोटी रूपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे.
सुरूवातीच्या दिवसांसाठी गल्ल्यात येणारी ही कमाई तशी कमी आहे. याचं कारण काहीही असलं तरी प्रियंका आणि निर्मात्यांना जी कमाईची अपेक्षा होती ती पूर्ण होतांना दिसत नाहीय.
बॉलीवूडची अभिनेत्री प्रियांका चोपडाचा चित्रपट मेरी कोमची पहिल्या तीन दिवसाची कमाई चांगली झाली. पहिल्या तीन दिवसात या सिनेमाने २७.५० कोटी रूपयांची कमाई केली. मात्र हा ग्राफ सोमवारी खाली येतांना दिसला. सोमवारी बॉक्स ऑफिसवर फक्त 3.75 कोटी रूपयांची कमाई दिसून आली.
उमंग कुमार यांनी या चित्रपटाचं निर्देशन केलं आहे, या सिनेमा १८०० सिनेमागृहात सुरू आहे. या चित्रपटाची पटकथा आणि प्रियांकाच्या दमदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतांना दिसतंय. हा सिनेमा आणखी उत्तुगं भरारी घेईल असं म्हटलं जातंय.
कारण रविवारी गणेश विसर्जन असल्याने अनेक जण सोमवारी सिनेमा गृहाकडे फिरकतील असं वाटलं नाही. मात्र गणेशोत्सवाचा थकवा दूर झाल्यानंतर पुन्हा मेरी कॉम भरारी घेईल, असं म्हटलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.