‘एलिझाबेथ एकादशी’वर वारकऱ्यांचा बहिष्कार

परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम असा प्रतिसादही मिळाला. पण, वारकऱ्यांनी मात्र या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Nov 20, 2014, 06:15 PM IST
‘एलिझाबेथ एकादशी’वर वारकऱ्यांचा बहिष्कार title=

आळंदी : परेश मोकाशी यांचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम असा प्रतिसादही मिळाला. पण, वारकऱ्यांनी मात्र या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

आळंदीमध्ये सध्या कार्तिकी निमित्तानं संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, या सोहळ्याला हजारो वारकरी उपस्थित होते. 

‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटात एकादशीचाच अपमान करण्यात आल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. एलिझाबेथ ही इंग्लंडची राणी जनतेवर अन्याय करणारी होती, तिचं नाव एकादशीला देणं अयोग्य असल्याचं म्हणणं आहे. यातून विठ्ठल, एकादशीचं व्रत, पंढरीची वारी यांचा अपमान झाल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. 

त्यामुळे त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकलायच पण, या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी ते शासन आणि सेन्सॉर बोर्डाकडे करणार आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून हा चित्रपट मागे घेण्यात यावा आणि संबंधितांना अटक करावी अशी मागणी रामेश्वर शास्त्री यांनी केलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.