विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप

ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसंच काही राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

Updated: Apr 27, 2017, 07:19 PM IST
विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसंच काही राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऋषी कपूर,  रणधीर कपूर, जॅकी श्रॉफ, रणजीत, सुभाष घई, चंकी पांडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजप खासदार किरीट सोमय्या यांनीही त्यांचे अंत्यदर्शन  घेतले. विनोद खन्ना हे मुत्रपिंडाच्या कॅन्सरने ग्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यानी मुंबईतल्या कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात  वयाच्या सत्तराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.